१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यात गायक जावेद अली, राकेश चौरासिया, पं. विजय घाटे, चारुदत्त आफळे यांचा सहभाग आहे. विशेष होईल.
१० ते १९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन, प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'बियाँड बॉलिवूड', महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा उलगडणारा 'रंग महाराष्ट्राचे', कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांचा 'ईर्शाद', 'स्वरभास्कर' हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, नीलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा 'हरि--प्रसाद'?????, हृषीकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा 'मेहफिल Unlocked', राजकीय नेत्यांशी गप्पांचा 'रंगारी कट्टा' हे कार्यक्रम सादर होणार आहेत.