पुणे : शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत. पोलिसांनी त्यांतील आरोपींना तातडीनं पकडलं. रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक शिरले आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी काही पावले उचलणार आहे. याचा प्रत्यय आपल्यला लवकरच दिसले. रेल्वे, एस टी, आरटीओ, ट्रॉफिक पोलीस, महापालिका, पीएमपी अशा सर्व प्रमुख घटकांशा समन्वयाने दीर्घकालीन उपाय योजना आखणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
अमिताभ गुप्ता म्हणाले, महिलांची सुरक्षितता आणि दहशतवाद्यांचा बिमोड हे पोलिसांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शहरातील प्रवाशांशी संबंधित ठिकाणांबाबत एस टी, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका अशा वेगवेगळ्या घटकांचा संबंध असतो. या सर्व घटकांशी बोलून आपण स्वत: संपर्क साधत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी होणारे महिलांवरील दुदैवी घटना रोखण्यासाठी या सर्व घटकांशी समन्वय साधून दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येणार आहे. सध्या तातडीने आरटीओ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची तपासणी सुरु केली आहे. शहरात अनेक ठिकाणी निर्जन स्थळे आहेत. अशा ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत.
मुंबईपेक्षा पुण्यात दंडात्मक कारवाई अधिक
वाहतूक पोलीस नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवर अधिक भर देतात, असे विचारले असता आयुक्त गुप्ता म्हणाले, की कोरोनाच्या काळात मुंबईपेक्षा पुणे पोलिसांनी अधिक कारवाई केली आहे. तब्बल ९० कोटी रुपयांचा दंड आकारणी झाली आहे. त्यामुळेच शहरात नागरिक मास्कचा वापर अधिक करु लागले व कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आले.
मेरी नजर में आया तो खतम
गुन्हेगारांवरील कारवाईबाबत गुप्ता म्हणाले, छोटे मोठे गुंड तलवारी, कोयते घेऊन केक कापणे, स्टेटस ठेवून दहशत पसरवत होते. तुम्ही समाजाचे वातावरण बिघडवत असाल तर ते खपवून घेणार नाही. अशा गुंडांना शोधून कारवाई केली. गुंडांचे रेकॉर्ड तयार करुन त्यांच्यावर एमपीडीए, मोक्का अशा कारवाई करुन गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील एक वर्षभराच्या कार्याबाबत आपण समाधानी असून अजून काम करायचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.