शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

शहरात संचारबंदीचे आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:09 AM

पुणे : कोरोना संसर्गामुळे शहरात रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे (५ किंवा ५ पेक्षा अधिक ...

पुणे : कोरोना संसर्गामुळे शहरात रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे (५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे वा फिरण्यास मनाई करणारा) आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कलम १८८ तसेच साथरोग अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

रविवारपासून (२८ मार्च) रात्री आठनंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

संचारबंदीच्या आदेशातून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा तसेच वस्तू याबाबतच्या सवलती व इतर निर्बंध समाविष्ट असतील.

संचारबंदीचे आदेश लागू केल्यानंतर रात्री कामावरून घरी परतणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अडवणूक करण्यात येऊ नये, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील प्रमुखांना देण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या काळात एखादी व्यक्ती कामावरुन घरी निघाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी कार्यालयीन ओळखपत्र बाळगावे. मात्र, रात्री ८ नंतर एखादी व्यक्ती विनाकारण फिरत असेल तर त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे डॉ़ शिसवे यांनी नमूद केले.