शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

खरीपावर संचारबंदीचा परिणाम होणार नाही; कृषिविभागाची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:15 PM

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी देखील लगबग सुरू केली आहे..

ठळक मुद्देखते-बियाणाचा मुबलक साठा खरीप हंगामासाठी 1 लाख 80 हजार मेट्रिक टन खताच्या मागणीस शासनाने दिली मंजुरी

- रविकिरण सासवडे -  बारामती : जिल्हा परिषदेच्या कृषिविभागाच्यावतीने आगामी खरीप हंगामाची जय्यत तयारी झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीचा खरीप हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांना बियाणे व खते वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील. खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत,  अशी माहिती प्रभारी जिल्हा कृषिविकास अधिकारी संजय विश्वासराव यांनी दिली.  पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये तृणधान्य व कडधान्य लागवडीखाली 1 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्र येते. तृणधान्यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, नाचणी आदी तर कडधान्यामध्ये मूग, मटकी, पावटा,  वटाणा आदी पिकांचा समावेश होतो. उर्वरित 81 हजार हेक्टर क्षेत्रावर गळीतधान्य लागवड होते. खरीप हंगामासाठी 1 लाख 80 हजार मेट्रिक टन खताच्या मागणीस शासनाने मंजुरी दिली आहे. आपल्याकडे 26 हजार क्विंटल बियाणाची मागणी केली होती. 28 हजार 686 क्विंटल बियाणे पुरवन्यात येईल असे महाबीज, नॅशनल सीड कॉपोर्रेशन तयारी दर्शवली आहे. येत्या पाच ते सहा दिवसात बियाणे पोहच होईल. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी देखील लगबग सुरू केली आहे. गहू, उन्हाळी बाजरीच्या काढण्या झालेल्या आहेत. शेत मशागत करून तापवली जात आहेत. 

शेतकऱ्यांना खते व बियाणे चांगल्या दजार्ची तसेच योग्य दरात मिळावीत यासाठी कृषिविभाग लक्ष ठेवून आहे. यासाठी तालुकास्तरावर तपासणी पथक तयार ठेवण्यात येत आहे. स्वत: बियाणे कंपन्या सुद्धा याबाबत जागरूक आहेत. शेतकरी देखील खरेदी केलेल्या बियणाची पावती व नमुने जवळ बाळगत असल्याने निकृष्ट बियाणे पुरवणारावर कारवाई करता येते. 

पीक निहाय, तालुका निहाय बियाणे मागणी (क्विंटलमध्ये) तालुका                 मागणी आंबेगाव                  2,460.69बारामती                    719.78भोर                        2, 540.89दौंड                         203.00हवेली                       629.93इंदापूर                      761.81जुन्नर                      5, 832.53खेड                       4, 156.15मावळ                     2, 809.12मुळशी                    1, 758.07 

तालुकानिहाय मंजूर खते (मेट्रिक टनमध्ये) तालुका                           खते आंबेगाव                        20, 475बारामती                        17, 804भोर                             5, 341दौंड                            16, 914हवेली                          16, 024इंदापूर                          17, 804जुन्नर                           21, 365खेड                             20, 475मावळ                           4, 451मुळशी                           4, 451पुरंदर                            9, 792शिरूर                          21, 365वेल्हा                           1, 780 

टॅग्स :BaramatiबारामतीagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीweatherहवामानCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस