: दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड गुरुवार दिनांक २९ तारखेला होत असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माजी सभापती भगवान आटोळे व उपसभापती राजू सखाराम जगताप यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याने इच्छुकांनी कंबर कसली आहे. यापूर्वी सभापती म्हणून रामचंद्र चौधरी, सागर फडके, भास्कर देवकर, दिलीप हंडाळ, राजू पाचपुते, भगवान आटोळे यांनी काम पाहिले आहे. विद्यमान संचालक मंडळातील शिवाजी वाघोले, सागर शितोळे व संभाजी ताकवणे यापैकी कुणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. शिवाजी वाघोले हे देलवडीचे माजी सरपंच असून, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना थांबविण्यात आले. त्यामुळे त्यांनाच सभापतिपद द्यावे, असा समर्थक दावा आहे. गेली वर्षभर अलिप्त असणारे सागर शितोळे या निवडणुकीत उत्सुकता दर्शवली आहे, तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या भूमिकेत संभाजी ताकवणे आहेत. संचालक मंडळाची मते पक्षश्रेष्ठी जाणून घेतील व नंतर निर्णय जाहीर करतील. याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे हे संचालक मंडळाच्या मुलाखती घेतील. त्यानंतर सभापती व उपसभापतिपद ठरविण्यात येणार आहे.
दौंड बाजार समिती सभापती निवडीबाबतबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:10 AM