शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

छत्रपती कारखान्याच्या निकालाबाबत उत्सुकता

By admin | Published: April 27, 2015 4:49 AM

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ‘बारामती एमआयडीसी’तील वखार महामंडळाच्या

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ‘बारामती एमआयडीसी’तील वखार महामंडळाच्या गोदामात ही मोजणी होणार आहे. या मोजणीसाठी एकूण ७६ टेबलांवर ४०० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. सकाळी सात वाजता मोजणी सुरूहोईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सह निवडणूक अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता मतपेट्या ठेवलेली स्ट्राँग रूम उघडली जाणार आहे. त्यातून एकाच वेळी सर्व मतपेट्या बाहेर काढल्या जाणार आहेत. ‘ब’ वर्ग प्रतिनिधी गटाचा निकाल सर्वांत अगोदर जाहीर होईल, तर राखीव प्रवर्गापासून मतमोजणी सुरू होइल. राखीव प्रवर्गातील पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. राखीव गटानंतर सर्वसाधारण प्रवर्ग मोजणीसाठी घेतले जाणार आहेत. वेगवान, अचूक मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सध्या केलेल्या नियोजनानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. मात्र, मतदारांकडून ‘क्रॉसिंग’व्होटचे प्रमाण अधिक झाल्यास काही प्रमाणात वेळ लागेल. प्रत्येक टेबलसाठी ४ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. बाहेर अफवा पसरविण्यास मोबाईल कारणीभूत ठरतो. हा पाठीमागील दोन कारखान्यांच्या निवडणुकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी मोबाईल बंदी करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या वेळी मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणीच्या कागदाचा नमुना दिलेला आहे. त्यामुळे मतमोजणी करणारे, पाहणाऱ्या दोघांचा मोजणीचा नमुना एकच राहील.