शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:11 IST

एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली.

वारजे माळवाडी:  एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली. वन विभाग, एनडीए प्रशासन व तसेच वारजे व उत्तमनगर पोलिसांनी बराच वेळ शोध घेतला.. तसेच बिबट्याला पाहण्यासाठी न दिसल्याने शेवटी बिबट्या दिसला ही अफवाच असल्याचे सिध्द झाले आहे.  याबाबत पोलीस व वन प्रशासनातर्फे दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. दुपारी बाराच्या सुमारास वारज्यातून शिवणेकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीस एनडीएच्या सीमाभिंतीजवळ बिबट्या नजरेस पडला. त्याने आरडा ओरड केल्यावर हा बिबट्या आतमध्ये दाट झाडीत पळून गेला आहे. दुसरी शक्यता वारज्यातील मुंबई- बंगळुरू महामार्गाजवळ डुक्कर खिंड भागात देवयानी इमारत आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेस सकाळी बिबट्या दिसल्याची देखील चर्चा रंगली होती. सदर महिलेने माहिती कळवण्याच्या वृत्तास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी वृत्तास दुजोरा दिला. पण त्या महिलेशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी मान्य केले. 

दरम्यान वन विभागाचे कात्रज येथील एक टीमने एनडीए हद्दीत आतपर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बिबट्यासारखा अत्यंत चपळ असलेला प्राणी एनडीएच्या विस्तीर्ण अशा जंगलात कच्च्या रस्त्याने एका वाहनात बसून शोधणे व सापडणे अवघड आहे. ......................नागरिकांची करमणूक - येथील गणपती माथा परिसरात दुपारी बारा वाजल्या पासून तीन वाजेपर्यंत नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. येणारे जाणारे प्रत्येक जण काय झाले?  याची चौकशी करून आपली वाहने बाजूला उभे करुन सीमा भिंतीजवळ येत आतमध्ये  बिबट्याचा शोध घेत होते. .............. दुपारी साडे बाराच्या सुमारास कोणी भगत नावच्या व्यक्तीने नियंत्रण कक्षाला बिबट्या दिसल्याची माहिती दिली होती. त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने आपण स्वत: बिबट्या पाहिला नाही पण मोठी गर्दी झाल्याने व त्याचे कारण समजल्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण नियंत्रण कक्षाला माहिती कळवल्याचे त्याने सांगितले. प्रकाश खांडेकर - पोलिस निरीक्षक गुन्हे,वारजे 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीnda puneएनडीए पुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस