सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 07:22 PM2020-01-04T19:22:46+5:302020-01-04T19:25:18+5:30

काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर यांची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही

Currently condition of BJP in the state is without water fish : Balasaheb Thorat | सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभ

पुणे : राज्यात भाजपाचे सरकार आले नसल्याने त्यांची स्थिती पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी झाली आहे अशा शब्दांत काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खासदार गिरीश बापट यांना प्रत्युत्तर दिले.तसेच काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर यांची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही वा त्यांना दिलासा देऊ शकले अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर थोरात यांनी केली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभासाठी बाळासाहेब थोरात हे पुण्यात आले होत.त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, शपथविधीनंतर मंत्र्यांचे खातेवाटप रखडले असताना शनिवारी सकाळी अब्दुल सत्तार यांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्याने महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
परंतु, आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घतेली पाहिजे की,महविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये अनेक दिग्गज, अनुभवी असले तरी मत्रिपदे ही  मर्यांदित आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार पदांचे वाटप होणे शक्य नाही.काळाच्या ओघात राजकारणात देखील वेग आला आहे. 
   पुढे थोरात यांनी सांगितले की, पालकमंत्री पदासाठी जे वाद आहेत त्या संदर्भात नवीन चेह?्यांना संधी देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे प्रयत्न केले जात आहे. तसेच माज्याकडे राज्याचे महत्वाची पदे आहेत. मला जरी पालकमंत्री पद मिळाले नसले तरी मी माज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करेल. 

Web Title: Currently condition of BJP in the state is without water fish : Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.