शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडा; आदेश; बारामती परिमंडलाच्या अभियंत्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 5:41 PM

कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम

बारामती : कोरोना काळात जोखीम पत्करुन अखंडित वीजपुरवठा करुनही वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरण्यास चालढकल केल्याने आर्थिक स्थिती बिकट बनल्याचे चित्र आहे. परिणामी महावितरण पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये आले आहे. महावितरणने कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण २६ लाख ५६ हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील ७ लाख ३५ हजार ५१२ हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सर्व शेतककडे मिळून ८१४२ कोटींची थकबाकी होती. दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत २२२१ कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी ५९२० कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्केची माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे.

दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ १०.४२ टक्के (७६६८९) शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेत १२५ कोटींची थेट माफी मिळवली आहे. या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुध्दा केले आहे. तर बºयाच शेतकºयांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. तसेच ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.————————————————————घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही १३३८ कोटींची थकबाकीबारामती परिमंडलात शेती वगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील ९ लाख ४२ हजार ७८३ ग्राहकांकडे १३३८ कोटी ६२ लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे ८ लाख १० हजार ग्राहक असून त्यांचेकडे १८३ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या