पाषाण (पुणे):पुणेविद्यापीठ ते पाषाण रस्त्यावर मोठे वृक्ष फुटपाथ व सायकल ट्रॅकला अडथळा म्हणून तोडण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. वृक्षतोड करून राबविण्यात येत असलेले पर्यावरणपूरक उपक्रम हे नक्की कोणत्या विकासासाठी असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित करत या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर तयार करण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याची परवानगी पुणे महानगरपालिकेने दिली आहे. यामुळे सुमारे 25 वर्ष जुनी असलेली झाडे या सायकल ट्रॅकसाठी तोडण्यात येणार आहेत. तर काही झाडे तोडण्यात आले असून सायकल ट्रॅकसाठी झाडे तोडण्यात येऊ नयेत अशी मागणी या परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
यापूर्वीही पालिकेने तयार केलेले सायकल ट्रॅक वापरात नाहीत. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठेवण्यात आलेल्या सायकली देखील सध्या पाहायला मिळत नाहीत. असे असताना सायकल ट्रॅकसाठी सुमारे पन्नास वर्षांपासून अधिक जुनी असलेली झाडे तोडून पालिका पर्यावरणाचे नुकसान करीत आहे. पालिकेच्या या कायदेशीर वृक्षतोडीचा पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला असून सायकल ट्रॅक्टरचा मार्ग बदलण्यात यावा व वृक्ष लागवड पुन्हा करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
वसुंधरा स्वच्छता अभियानचे दीपक श्रोते म्हणाले, नागरिक म्हणून आम्हाला नकोय असा उजाड करणारा विकास. या आधी मनपाचे वृक्ष पुनर्ररोपनात झाडे जगत नाही हा अनुभव आहेच. यामुळे वृक्षतोड करणे येऊ नये.