शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

पोलीस रायझिंग डे निमित्त सायबर गुन्हे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:18 AM

आॅनलाइन फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन : सोशल मीडियाच्या विधायक वापराचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त सायबर गुन्हे जनजागृती मोहिमेंतर्गत लोणी काळभोर व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर गुन्ह्यांच्या जनजागृतीविषयी विद्यार्थी, विद्याथिनर््ाी; तसेच शिक्षकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली

लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत किस्टोन स्कूल आॅफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात पुणे सीआयडी सायबर सेलचे वैैभव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे, आॅनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड व इतर मुद्द्यावर मार्गदर्शन केले. बँक आपल्या खातेदारांना खाते व एटीएम संबंधित माहिती विचारत नाही, ती कोणलाही देऊ नका. याप्रकारचे कॉल आल्यास तत्काळ बँक शाखेशी नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. मोबाईलवर येणारे बँक मेसेज काळजीपूर्व वाचा. मोबाईल नंबरवर येणारे ओटीपी पासवर्ड असतो. तो कुणालाही देऊ नका. एटीएममधून पैसे काढताना पासवर्ड टाकताना कुणालाही दिसणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनीही संबोधन केले. याप्रसंगी कॉलेजचे डायरेक्टर यशोधन सोमन, प्राचार्य जालिंदर कसबे, औताडे -हांडेवाडी पोलीस पाटील रोहिणी दीपक हांडे, होंडा कंपनीचे माजी डायरेक्टर, किस्टोन कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यासंदर्भात, उपस्थितांंशी संवाद साधताना साळुंखे यांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वत: स्वाइप करा, बँक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा, पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्ड वारंवार बदला. एटीएममधून पैसे निघत नसल्यास बँकेशी संपर्क साधावा. सोशल नेटवर्किंग साइटवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. त्यांच्याशी कोणतीही व्यक्तिगत माहिती अथवा फोटोची देवाणघेवण करू नका. माहिती अथवा फोटो शेअर करताना पूर्ण विचार करा. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दाखविलेल्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही एसएमएस, व्हॉट्सअप मेसेजला उत्तर देऊ नका. मोबाइलवर अथवा मेलवर लॉटरी लागली आहे, अथवा तुमचा मोबाइल नंबर लकी विनर आहे, असे सांगून खोटे फोन कॉल किंवा मेसेज येऊ शकतात. अशा फोन कॉल व मेसेजला बळी न पडता अज्ञात बँक खात्यात पैसे जमा करू नका, असे सांगितले. ई - मेलच्या माध्यमातून कंपनीत नोकरी लागलेली असल्याचे सांगून आॅफर लेटर दिले जाते. या प्रक्रियेमध्ये कागद पडताळणी फी, बाँड फी, सिक्युरिटी डिपॉझिट या वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीच्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारच्या कॉल्सना बळी पडू नका, असेही त्यांनी सांगितले.उरुळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी मोबाईल फोनवर अथवा संगणकावर फेसबुक अकाउंट सुरू करताना युजर आयडी व पासवर्ड कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. मित्र अथवा मैत्रिणींना आपले फेसबुक वापरण्यास देऊ नका, पासवर्ड शेअर करू नका. दुसºयाचे फेक फेसबुक अकाउंट काढणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर, फोटो पोस्ट करणे, फॉरवर्ड करणे, कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहीती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, भडकावू संदेश पाठवू नका आणि अश्लील चित्रफीत व चित्रे पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले.बेल्ह्यात विद्यार्थिनींना शस्त्र ओळख व हताळणीचे मार्गदर्शनबेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संकुल येथे आळेफाटा पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस रायझिंग डेचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात विद्यार्थिनींना रायफलची कार्यपद्धती आणि ओळख व्हावी, म्हणून ४ शस्त्रे दाखवण्यात आली.मुलींना शस्त्रे कशी पकडायची, अचूक निशाणा साधण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची आणि हातांच्या विशिष्ट हालचालींवर बारीक नजर कशी ठेवावी, याचे प्रात्यक्षिक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी करून दाखवले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मुजावर म्हणाले, ‘सायबर क्राईम हा सध्याचा ज्वलंत विषय असून त्याबाबत सावधगिरी बाळगा व आपली फसवणूक आपणच टाळा. सोशल मीडियाचा वापर मर्यादित व सुरक्षितपणे करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. इंटरनेटवरून वस्तू खरेदी करताना साईटची विश्वासार्हता तपासून मगच पेमेंट करा. आपला प्रोफाइल व त्याअनुषंगाने येणारी वैयक्तिक माहिती, आपला फोटो याबाबत सावधगिरी बाळगा. आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड, त्याचा पिन नंबर इतरांना सांगू नका.’शिबिरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून तब्बल २४ विद्यार्थिनींना प्रमाणपत्रवाटप करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, बी. सी. एस. विभागाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, डॉ. दीपराज देशमुख, पोलीस ठाण्याचे नीलेश कारे, एम. एस. पठारे, ए. एस. फलके, एन. टी. गायकवाड, एच. आर. ढोबळे, जी. पी. राहाणे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपराज देशमुख यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे