१९८३ साली हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात भांडवलकर कुटुंबीयांना जमीन संपादित करताना त्याचा मोबदला मिळणे अपेक्षित होते. परंतु तो मिळाला नाही त्यांची एकूण पाच एकर व नंतर सोळा गुंठे जागा हडपण्यात आली असल्याचा भांडवलकर कुटुंबीयांचा सासवड नगरपालिकेवर आरोप आहे. सद्यस्थितीत तेथे नगरपालिकेने उद्यानाच्या नावाने जागा घेऊन येथे व्यावसायिक गाळे उभारण्यात येत असल्यामुळे भांडवलकर कुटुंबीयांनी उपोषणास सुरुवात केली असून आमची जागा आम्हाला परत मिळावी, अशी मागणी केली आहे.
भांडवलकर कुटुंबीयांना या जागेचा राज्य शासनाकडून किंवा सासवड नगरपालिकेकडून याचा मोबदला किंवा जमीन परत मिळत नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरू ठेवण्याचे निर्धार यावेळी या भांडवलकर कुटुंबीयांनी केला आहे. शासनाने या मागण्या मान्य न केल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, तुकाराम भांडवलकर, रामदास भांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, हरिश्चंद्र भांडवलकर, वसंत भांडवलकर यांसह शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी आदी राजकीय पक्षांनी या चक्री उपोषणास पाठिंबा दिला आहे.
१० सासवड
चक्री उपोषणास बसलेले भांडवलकर कुटुंबीय.