या मोहिमेत अनिल कल्याणी, आनंद मोने, श्रीनिधी एकबोटे, अवधूत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, ओंकार कराडकर, निखिल मुळे, प्रफुल्ल शेंडे, संग्राम पाटील आणि संतोष इनामदार यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी मनाली ते खरडूनगर हा ४७५ किलोमीटरचा घाट रस्ता पूर्ण करण्याची माेहीम यशस्वी केली.
संतोष इनामदार म्हणाले, ‘‘आम्ही या आधी बऱ्याच लहान-मोठ्या राईड केल्या होत्या, पण हिमालयात राईड झाली नव्हती. तेव्हापासून डोक्यात होतेच पण हा मार्ग खूप आव्हानात्मक होता, पण आम्ही ते आव्हान स्वीकारले. त्यासाठी आम्ही पुण्याचा जवळपास असणारे कात्रज, बोपदेव घाट, मरीआई घाट तसेच सिंहगड या ठिकाणी सरावासाठी सायकलिंग केले. ’’
—————————————-
लहान-मोठे ओढे अन् बर्फाचे पाणी
मनाली-लेह हा पूर्ण पाचशे किलोमीटरचा घाट रस्ता तसेच दहा हजार फुटांपेक्षा उंच असलेल्या पाच खिंडी यात सर्वात उंच खिंड १८,३६० फूट होती. असे उंचीवरून हा मार्ग जात असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तसेच दिवसा ऊन व रात्री थंडी असे विरुद्ध हवामान आणि तुमचा रस्ता अडवणारे लहान-मोठे ओढे ते ही बर्फाच्या पाण्याचे अशी वेगवेगळी आव्हाने होती, पण निसर्ग इतका सुंदर आहे की, आपण आपले कष्ट विसरून जातो, असे इनामदार म्हणाले.
————————-
सायकलीवर दहा-बारा किलो वजन
या मोहिमेत पुण्यातील सिटी सायकलिस्ट क्लबचे दहा सदस्य सहभागी झाले होते आणि विशेष म्हणजे ही मोहीम सेल्फ सपोर्टेड होती, कोणतीही बॅकअप गाडी नव्हती, प्रत्येकाच्या सायकलवर किमान दहा-बारा किलो तरी समान होते, अशी ही आव्हानात्मक मोहीम आम्ही ५ जुलै ते १३ जुलै या दरम्यान यशस्वी केली.
——————