पुणे: 'तौत्के' चक्रीवादळामुळे सोमवारी १७ मे रोजी पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे - भुज एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. भारतीय हवामान खात्याने १८ मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. सोमवारी ही गाडी रद्द झाल्याने बुधवार १९ मे रोजी भुज हून पुण्याला येणारी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ६१ रेल्वे रद्द पश्चिम रेल्वेने १६ ते २० मे पर्यत गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास ६१ रेल्वे रद्द केल्या आहेत. यात मुंबई,पुणे,सह दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.१७ व १८ मे रोजी प्रवास सुरु करणारी व पुणे स्थानकावरून धावणारी राजकोट सिकंदराबाद - राजकोट एक्सप्रेस. राजकोट - वेरावल एक्सप्रेस व पोरबंदर - सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना दिली.