शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

सोमेश्वरनगर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून आग, मोलमजुरी करणारे कुटुंब उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 8:12 PM

निरा-बारामती रस्त्याच्या शेजारील डॉ.आंबेडकर वसाहतीला  मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी घरगुती गॅसचा स्फोट झाला

ठळक मुद्देचार झोपड्या जळून खाक :अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान

सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील निरा-बारामती रस्त्याच्या शेजारील डॉ.आंबेडकर वसाहतीला  मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी घरगुती गॅसचा स्फोट झाला.या स्फोटाने  लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत गरीब कुटूंबातील मोलमजुरी करणाऱ्या चार कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे.  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आणि ज्युबलियंट कंपनीच्या दोन अग्निशामक बंबाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.त्यामुळे वेळेवर आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. याठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांची जवळपास २५ घरांची झोपडपट्टी आहे. झोपडीच्या चारी बाजूने पाचटापासून तयार केलेल्या भिंती तसेच छतावर पत्रा होता. त्यामुळे एका झोपडीतुन दुसऱ्या झोपडील आग लागली. मंगळवारी दुपारी घरातील गॅसला अचानक आग लागल्याने या आगीत एक शेळी आणि कोंबड्या मरण पावल्या .तर घरातील संसारउपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही, कपाट, घरातील विद्यार्थ्यांचे शालेयसाहित्य आदी चार कुटुंबाचे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कल्पना शहाजी खांडेकर, प्रमिला दर्याप्पा गोडसे, जमुनाबाई परशुराम घाडगे आणि शालन अशोक कोकरे असे झोपड्या जळालेल्या कुटुंबाची नावे आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करत मदत केली. ऐन उन्हात आग लागल्याने परीसरात आगीचे लोट तयार झाले होते. वाघळवाडीचे ग्रामसेवक सुभाष चौधर, वडगाव निंबाळकरचे पोलिस कर्मचारी महेंद्र फणसे, नितीन बोराटे तसेच एचपी गॅसच्या कर्मचाºयांनीही घटनास्थळी भेट दिली.———————————————————— छोट्या श्रावणीचे धाडस.....सुरुवातीला कल्पना खांडेकर यांच्या घराला आग लागली. यावेळी कल्पना खांडेकर या कामावर गेल्या होत्या. मात्र, त्यांची चौथीत शिकणारी मुलगी श्रावणी एकटीच घरी होती. अचानक तिला तीव्र उष्णता जाणवु लागली. बाहेर येऊन तिने पाहिले तर घराच्या बाहेरील बाजूस आग लागली होती. तिने तो विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र तिच्या प्रयत्नाला यश आले नाहि. त्यामुळे  श्रावणीने वेळेचे भान राखून घरातील तीन शेळ्या सोडविल्या.  मात्र एक लहान शेळी आणि काही कोंबड्या या घटनेत बळी पडली. आपल्या बोबड्या आवाजात घडलेली घटना तिने सांगितली.या आगीत तिला किरकोळ दुखापत झाली आहे. तीच्या या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.——————————————————  ग्रामस्थ करणार मदत...आज दुपारी अचानक ही घटना घडल्याने या चारही घरातील संसारपयोगी सर्वच साहित्य जळून खाक झाले.या घटनेने ही कुटुंब उघड्यावर पडली. वाघळवाडी ग्रामस्थ या कुटुंबाना घरे उभारण्यासाठी पत्रे उपलब्ध करून देणार आहे. गावातील इतर लोकांनी त्याच्या जेवणाची व कपड्यांची जबाबदारी उचलली आहे. ————————————  ...आता मी अभ्यास कसा करूया आगीत सर्वच साहित्यासह शाळकरी मुलाची व पुस्तके जळून खाक झाली आहेत, माझी परीक्षा दोनच दिवस झाली सुरू झाली आहे. आता मी अभ्यास कसा करू असे, भावनिक होऊन श्रावणी सांगत होती. यावेळी भारत ज्ञान विज्ञान संघटनेने श्रावणी सह जळीत कुटुंबातील सर्वच शाळकरी मुलांच्या कपडे व आणि पुस्तकांनी तातडीने सोय केली.  

टॅग्स :Baramatiबारामतीfire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआग