कुसूर येथील सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात ; पाच लाखांचे नुकसान जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचायांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. स्फोटामुळे पांडुरंग बबन मोधे यांच्या घरासह संसारोपयोगी सर्व साहित्य, अन्य सामान तसेच कागदपत्रे जळून गेल्याने त्यांचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मंडल अधिकारी आर. व्ही. सुपे व तलाठी पी. आर. इंगळे यांनी सांगितले. तलाखीवस्ती, कुसूर येथील पांडुरंग मोधे यांच्या सूनबाई गीता या गुरुवारी सायंकाळी घरात स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरच्या नळीने पेट घेतला. त्यांनी ताबडतोब घरातील छोट्या मुलाला घेऊन बाहेर पळ काढला. त्या घराबाहेर पडल्यावर लगेचच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वीच घराबाहेर पडल्याने मुलांसह गीता यांचे प्राण वाचले. आग लागली तेव्हा घरात त्या एकट्याच होत्या. घरातील अन्य पाच सदस्य बाहेर गेले होते. यामुळे जीवितहानी झाली नाही; परंतु घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळाल्याने अंगावरील कपड्यांशिवाय त्याच्याकडे काहीच राहिलेले नाही.परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल २ तासांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मोधे कुटुंबीयांना जवळपास ८१ हजारांची मदत केली.
कुसूर येथील सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात ; पाच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 8:03 PM
जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
ठळक मुद्देजीवितहानी झाली नाही; परंतु घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान