पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली.या प्रकरणातील आरोपींवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढविल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी९० दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी ४५दिवसांत मुदत दिली आहे. सीबीआयच्या मागणीस विरोधकरीत मुदतवाढ देण्याचे अधिकार संबंधित न्यायालयाला नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकीलअॅड. धर्मराज चंडेल आणिअॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला होती. मात्र, मुदतवाढ देण्याचे अधिकार याच न्यायालयास आहे, असे स्पष्ट करीत कोर्टाने अंदुरे याने जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला.गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बंदूक अद्याप जप्त करायची आहे. तसेच हत्या २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे गुन्ह्यातील पुरावे शोधण्यासाठी वेळ लागणार असून त्यासाठी मुदत देणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने मुदतवाढ देताना सांगितले.तपासाची थेअरीडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कट कोणी रचला, त्यांच्यावर कोणी गोळ््या झाडल्या, शस्त्र कोणी पुरवले, रेकी कोणी केली, आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, अशी तपासाची थेअरी आता स्पष्ट झाली आहे.
दाभोलकर हत्याप्रकरण: दोषारोपपत्रासाठी सीबीआयला मुदतवाढ, ४५ दिवसांचा अवधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:21 AM