टाकळी हाजी : राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.कवठे येमाई (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे बोलत होते.या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हप्रमुख राम गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, अविनाश रहाणे, तालुका प्रमुख अनिल काशिद, देवीदास दरेकर,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी सदस्य डॉ. कल्पना पोकळे, माजी सरपंच बबनराव पोकळे, किरण देशमुख, संदीप जठार, पोपट शेलार, लहू वागदरे, राजेश सांडभोर, मारुती वागदरे आदि उपस्थित होते.आढळराव पाटील म्हणाले, की सरकारची भूमिका ही बैलगाडा सुरू करणाºयांच्या विरोधातील असून, त्यासाठी लोकसभेत विधेयक मंजूर करावे लागणार आहे. ते झाले नाही तर शेवटी न्यायालयीन लढाईत बैलगाडामालकांसोबत राहून, न्याय मिळवून देऊ. काही लोक दुसºयांच्या कामाचे श्रेय घेत असून, पराग कारखाना कुणाचा आहे, हे समजण्याएवढी जनता खुळी नाही, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.कवठे येमाई येथे आज राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेनेने दोन रस्त्यांचे भूमिपूजन केले. त्याच कामांचे बुधवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे काम नेमके केले कुणी, असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - दादासाहेब भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:53 AM