"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 01:13 PM2023-07-16T13:13:34+5:302023-07-16T13:14:02+5:30

तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आला, पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते मिळाले, जरा आता आमचाही विचार करा

Dada take municipal elections Vasant More request to Ajit pawar | "दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

googlenewsNext

पुणे: फेसबुकच्या राजकीय पोस्ट वरून नेहमीच चर्चेत असणारे पुणेमनसेचे नेते वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुकांबाबत फेसबुक पोस्ट करत अजितदादांना विनंती केली आहे. आमचाही विचार करा असं म्हणत  दादा घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका असं ते म्हणाले आहेत. 

सध्यस्थितीत राज्यात महानगपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. पालिकांवर प्रशासक राज आहे. आजी माजी नगरसेवक निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत. आताच्या सरकारने मात्र याबाबत निवडणुका होण्याचं आश्वासन दिलंय, परंतु तारीख निश्चित केली नाही. हे वर्ष सुरु झाल्यापासून प्रभाग रचनेतही बदल करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्याच पुढं काही झालं नाही. २०१७ मध्ये भाजपच्या सत्तेत ४ ची प्रभाग रचना करण्यात आली होती. तर २०१९ ला महाविकास आघाडीच्या काळात ३ ची प्रभाग रचना करण्यात आली. पण आघाडी सरकार जास्त काळ टिकले नाही, त्यामुळे हा विषय पुन्हा लांबणीवर गेला. त्यावरूनच आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर वसंत मोरेंनी त्यांना विनंती केली आहे. 

मोरे म्हणतात, होय दादा एक विनंती करू का? 2021 मध्ये तुम्ही उपुख्यमंत्री असताना तुम्ही आणि तुमच्या पूर्वीच्या महविकास आघाडी सरकारने प्रचंड कष्ट करून पुणे महानगरपालिकेची  3 नगरसेवकांची प्रभाग रचना केली होती. जी आजही कायम आहे अगदी अगदी आरक्षणाची सोडत ही पूर्ण झालेली आहे.  निवडणुका तुम्ही घेणारच होता पण सारं केलेले कष्ट वाया गेले. राज्यात सत्ता बदल झाला आता परत तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलात पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते ही मिळाले आहे. जरा आता आमचाही विचार  करा की दादा घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका असं मोरे म्हणाले आहेत. 

Web Title: Dada take municipal elections Vasant More request to Ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.