शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

राज्य सरकारकडून पात्र उमेदवारांच्या पाठीत खंजीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:14 AM

अमोल अवचिते पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात ...

अमोल अवचिते

पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून, २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र उमेदवारांना पाठवले आहे. त्यामुळे सरकारने विश्वासघात केला असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.

या जुलै २०१९ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अडकली. त्यामुळे लॉकडाऊननंतरच प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेची तिसरी निवड यादी जानेवारी ते मार्च २०२० यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. लॉकडाऊनमुळे काही उमेदवारांची कागद पडताळणी होऊ शकली नाही. लॉकडाऊन संपताच पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल. असे विभागाकडून पात्र उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र तात्पुरत्या स्वरूपाची विचाराधीन असलेली तिसरी निवड यादी सामान्य प्रशासनाच्या नियमावलीनुसार परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे सांगण्यात आले.

त्यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळाले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली.

कोट

“पाच महिन्यांत आम्हाला नियुक्तीपत्र का देण्यात आलीे नाही? सरकार व संबंधित विभागाकडून अत्यंत असंवेदनशीलपणे आम्हाला कोणतीही चूक नसताना प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येते का?”

-तृप्ती निकम

चौकट

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे व आम्हाला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू नये. आम्ही सामान्य कुटुंबातील मुले आहोत. एका नोकरीने परिस्थिती बदलते.”

-प्रियांका आंबी.

चौकट

परीक्षा होऊन अडीच वर्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यकाळ वाढवून घेता येतो. पण या अकार्यक्षम विभागाने हे केलं नाही. हे असच चालू राहील तर विद्यार्थी नक्षलवादाकडे वळायला वेळ लागणार नाही..

- ज्ञानेश्वर मडके

नियुक्ती प्रक्रिया चालू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा शांत राहिलो. पुढील निर्णय शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

-मुकेश घुगे

निवड यादीची कालमर्यादा संपली एवढं सांगून विभागानेच हात झटकले.. यात विद्यार्थ्यांचा काय दोष.. आज पास होऊनही दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून कामाला जावं लागतं.

-सोनाली घनवट