शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 2:46 PM

७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन सरपण डोक्यावर आणतात

ठळक मुद्देमांगनेवाडीत गॅस ना रॉकेल : उज्ज्वल गॅस योजना २५ कुटुंबांपुरतीचअंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने तो करण्यासाठी खूप संघर्ष

मोहन लांडे - मढ :  मढ आणि जुन्नर गावापासून केवळ दहा किमी अंतरावर असणाऱ्या मांगनेवाडी या गावातील २५ कुटुंबे सोडली तर इतर सर्वच कुटुंबीयांना महिलांना घरातील चूल पेटविण्यासाठी डोईवर सरपण घेऊन पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही या गावात केवळ २५ घरांमध्ये गॅस कनेक्शन आले आहे, तर उर्वरित घरामध्ये चुलीचा धूर निघतो. या धुरात या गावाचा विकास अद्यापही हरवून गेलेला आहे. त्यामुळे टीचभर पोटाची भूक मिटविण्यासाठी येथील महिलांच्या डोईवर अजूनही सरपणाचा भार वाहावा लागतो.जुन्नरच्या बाजूला गणेशखिंडीच्या पायथ्याशी सह्याद्री डोंगररांगेतील  मांगणी डोंगराच्या कुशीत वसलेली ६५ ते ७० घरांची वस्ती म्हणजे मांगनेवाडी. आजही आदिवासी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपली उपजीविका चालविण्यासाठी अजूनही ७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन वाळलेले सरपण डोक्यावर आणताना त्यांना जिवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. स्वत:च्या घराची जागा सोडली तर सर्वच कुटुंबे ही भूमिहीन आहेत. शेतजमिनी नसल्याने मिळेल ते काम आणि मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. याशिवाय विशेष म्हणजे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठीसुद्धा अडचण निर्माण होते. अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने अनेकांच्या हातापाया पडून मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी खूप संघर्ष आणि यातना सहन कराव्या लागतात...............सरपण आणताना पडल्याने महिलांचा गेला जीवआदिवासी बांधवांच्या डोक्यावरील मोळी खाली कधी येणार, हादेखील आदिवासी भागातील एक ज्वलंत प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आजही डोक्यावर सरपण वाहत आपली उपजीविका करण्याचे काम आदिवासी बांधवांना करावे लागत आहे. मागील महिन्यात करंजाळे येथील महिला सीताबाई रोहिदास भांगले वय वर्षे ३६ सरपण आणण्यासाठी रानात गेली असता पाय घसरून पडली, डोक्यावरील मोळी अंगावर पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.........शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचावेत

शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ खरोखरच गरजू लाभार्थ्यांना मिळतो का? किंवा त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का? पोहोचत असतील तर त्या कशा राबविल्या जातात? ग्रामपंचायतीला येणाºया निधीचा पुरेपूर उपयोग केला जातो का? हासुद्धा महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणून शासनाने वेळीच दखल घेऊन या समस्यांवर निश्चित उपाय शोधणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. जो पर्यंत शासनाच्या योजना गरजूंपर्यत जाणार नाही तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरील ओझ उतरणार नाही हेही निश्चित आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरState Governmentराज्य सरकारWomenमहिलाFamilyपरिवारCylinderगॅस सिलेंडर