माऊली शिंदे
पुणे :रस्त्यामध्ये अपघात नाही. कोणतेही गाडी बंद पडली नाही. नागरीक ही शिस्तीमध्ये वाहने चालवत होती. तरी, शुक्रवार आणि शनिवारी संध्याकाळी नगररोडवर मोठ्या प्रमाणात वाहुतक कोंडी झाली. हा एक ते दोन किमीचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना दोन तास लागले. मात्र, वाहतूक कोंडीच्या समस्येचा नेहमीच त्रास सहन करत करावा लागत असल्यामुळे नागरिकांसाठी रोजच '' ट्रॅफिक डे '' ठरत आहे. ..
पुणे नगर महामार्गावर शास्त्रीनगर ते खराडी बायपास या रस्त्याच्या दरम्यान मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. शुक्रवारी दिवसभर पाऊस होता. पासवामुळे अनेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली होती. तसेच रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. टाटा गार्डन येथील सिग्नल बंद होती. तसेच काही बेशिस्त वाहन चालक कसेही गाडी चालवत होते. यामुळे शास्त्रीनगर ते खराडी बायपास या रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहने कासव गतीने पुढे जात होते. या वाहतुक कोंडीमुळे अनेकांची महत्वाची कामे रखडली गेली. विमानप्रवास करणा-यांना कसरत करावी. वाहतुक कोंडीमुळे विमानाचे प्रवासाला मुकावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली होती. येरवडा ते खराडी बायपास या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याने या रस्त्यावरचा ताण विमाननगर, चंदननगर आणि वडगावशेरीच्या अतंर्गत रस्त्यावर आला. यामुळे अंतर्गेत रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. विमाननगर येथील निको गार्डन, फिनिक्स मॉल समोर, दत्त मंदिर चोक, साकोरे नगर आणि विमानतळ रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होते. साकोरे नगर आणि सिंम्बॉयसिस कॉलेज या चौकामध्ये वाहतुक नियंत्रित करण्यासाठी वॉर्डन नसल्याने. या चौकामध्ये संध्याकाळी पाचशे मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा असतात. या वाहतुक कोंडीच्या दहशतीमुळे स्थानिक नागरीक संध्याकाळी विमाननगर, नगररोड रस्त्यावर जाण्याचे टाळू लागले आहे.
विमानतळ वाहुतक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले की, शुक्रवारी पालखी निमित्ताने खराडी बायपास चौक येथून वाहतुक वळवली होती. नंतर केसनंदवरून सोलापुर रोडवरील सर्व वाहतुक नगररोडवर वळवली होती. त्याचा सर्व फ्लो नगररोडला आला होता. आता माझे अधिकारी व कर्मचारी विमाननगरमध्ये वाहुतक नियमन करत आहे..................काल रात्री मी चंदननगरमधून ८.१५ वा सोपाननगरला जाण्यासाठी निघालो.रस्त्यावरील वाहतुक कोंडी, सिग्नल बंद आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे दीड किमीचे अंतर पार करण्यासाठी एक तास लागला. मी ९.१७ मी घरी पोहचलो. वाहतुक खुपच संथ होती अशी माहिती वाहतुक कोंडीमध्ये अडकलेले प्रसाद गायकवाड यांनी दिली.........वाहतुक पोलिसांनी त्यांच्या दररोजच्या डयूटी वेळेमध्ये वाहतुक नियमानासाठी जास्त वेळ द्यावा. दंड करण्यासाठी वेळ वाया घालवू नये. वाहतुक नियम मोडणा-यांना दंड करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर वाढवून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
-आशिष माने, वडगावशेरी नागरीक मंच............चौकट:नगररोड वरील वाहतुक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका आयुक्त आणि वाहतुक विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. काल प्रभाग समितीच्या ंबैठकीमध्ये पालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रत्यक्ष भेटून वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी केली. पण प्रशासन नुसतेच तोडगा काढू असे खोटे आश्वासन देत आहे. प्रत्यक्षात, वाहतुक कोंडीवर उपाययोजना करत नाही. काल रात्री शास्त्रीनगर ते विमाननतळ चौकात येण्यासाठी दोन तास लागले. या वाहतुक कोंडीमुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे असे मत नगरसेविका श्वेता खोसे -गलांडे यांनी व्यक्त केले.