शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

दलित कुटुंबास जबरी मारहाण

By admin | Published: December 30, 2014 10:52 PM

इंदापूर पोलीस ठाण्यात दलित कुटुंबाला जबर मारहाण केल्या प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर : निमगाव केतकी येथील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आजी माजी सरपंचांसह १२ जणांवर शनिवारी (दि. २७ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यात दलित कुटुंबाला जबर मारहाण केल्या प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे.पंचायत समितीचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान सरपंच अंकुश जाधव, माजी सरपंच, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, निखील खराडे, शिवाजी भोंग, बबन जाधव, अमोल जाधव, तुषार जाधव, वैभव जाधव, सचिन जाधव, सागर चांदणे, बबलू जाधव, त्याचे वडील, त्याचे चुलते (सर्व रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या संदर्भात पंकज सुभाष मिसाळ (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) याने फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी सांगितले की, निमगाव केतकीच्या यात्रेत फिर्यादी व बबलू जाधव यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी बबलू जाधवने फिर्यादीस स्मशानाकडे ये, नाही तर गावात राहू नको, अशी धमकी दिली होती. दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे सर्व आरोपी फिर्यादीच्या घरात घुसले. हातातील कोयत्याने फिर्यादीच्या आईच्या डोक्यात वार केले, अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे पुढील तपास करत आहेत.(वार्ताहर)ज्या ठिकाणी घटना घडली त्या वेळी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. आम्ही गावातील प्रमुख पदांवर कार्यरत असल्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी या प्रकरणात आमची नावे घेण्यात आली आहे.- देवराज जाधव, जिल्हा परिषद सदस्य