लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या गेल्या तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्या. या वृत्तमालिकेचे शहरातील नागरिकांनी स्वागत करून आभार मानले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत दखल घेतली आहे. बुधवार (दि.१०) रोजी ‘दौंडच्या भाजीमंडईचा होतोय कचरा डेपो’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने घाणीच्या विळख्यात अडकलेल्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, जिजाबा दिवेकर, नगरसेवक शहानवाज पठाण, आरोग्य अधिकारी शाहू पाटील, राजू त्रिभूवन यांनी घाणीच्या साम्राज्यातील इमारतीच्या परिसराला भेट दिली. तेव्हा भाजी मंडईतील व्यापारी जमा झाले. त्यांनी देखील इमारतीतील घाणीच्या साम्राज्याबाबत नाराजी व्यक्त केली. सदरच्या इमारतीतील कचरा काढून ही इमारत पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दौंडची अस्वच्छ भाजीमंडई तोडणार
By admin | Published: May 12, 2017 4:58 AM