दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात वळवाच्या पावसाने धिंगाणा घातला असून, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मंगळवारी (दि. २) पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांचे कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी मांजरेवाडी, मलघेवाडी, होलेवाडी या परिसरात वादळी वाºयासह वळवाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेसहा वाजता वादळी वाºयासह पाऊस पडला. सुमारे एक तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी पाणी केले. निमगाव दावडी रस्त्यावर मांजरेवाडी गावादरम्यान रस्त्यावर सोसाट्याच्या वाºयाने झाड पडले. त्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक बंद होती. होलेवाडी येथे वीजवाहक तारा तुटून पडल्या, तसेच कांदापिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून अनेक ठिकाणी कांदा रोपे वाहून गेली. पुन्हा कांदा लागवड करावी लागणार आहे.