भोर : भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती रस्ते, पूल, शाळा अंगणवाड्या याची पाहणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे हिरडस मावळातील नीरा देवधर धरणाच्या रोडवरील कंकवाडी,धानवली,परहर, रायरी,साळव तर आंबवडे खोऱ्यातील भावेखल,अंगसुळे,कारी,सांगवी भिडे, करंजे पान्हवळ,नाझरे,आंबवडे,म्हाकोशी, वडटुंबी-शिवनगरी, कोर्ले,टिटेघर,चिखलगाव,रावडी, कर्नावड या गावातील भात शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अहवाल तयार करुन रस्ते मोऱ्या दुरुस्त करण्याच्या सूचना रणजित शिवतरे यांनी दिल्या.
बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत व नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन रणजित शिवतरे यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे हिर्डोशी
खोऱ्यातील भातशेती व रस्त्याची पाहणी करताना फोटो