लोकमत न्यूज नेटवर्कवाल्हे : गेले अनेक दिवस उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना रविवारी झालेल्या पावसाने चांगले झोडपले. वारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, गारा यांनी वाल्हे परिसराला चांगलेच झोडपले. पावसाने हरणी, पिंगोरी, मांडकी, दौंडज, पिसुटी व वाल्हे परिसरात चांगलीच हजेरी लावली. शेतीमध्ये पाणी साचले व शेतकऱ्यांना दिलासा दिला.परंतु, परिसरातील वादळ व गारा यामुळे डाळिंब बागांचे, सीताफळ, मका, कडवळ, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाले. सुक्कल वाडीतील प्रगतिशील शेतकरी माजी सरपंच दत्ता अण्णा पवार व ग्रामपंचायत सदस्य धनंजय पवार यांचे फळ आलेले डाळिंब गळून पडले. काही झाडे मुळा पासून उपटून पडली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सीताफळाच्या, फुलांच्या बागेत अंथरून झाले. मका, कोथिंबीर, पावटा या पिकांना पाला राहिला नाही.
वाल्हेत पावसाने नुकसान
By admin | Published: May 09, 2017 3:26 AM