शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

धरणांचा पाणीसाठा ३० ते ४० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 11:37 PM

कळमोडी, चासकमान, नाझरे, भाटघर धरणाचा समावेश : उर्वरित धरणात १५ ते २० टक्के साठ्याचा तुटवडा

पुणे : नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पाणी देणाºया धरणात १५ ते २० टक्के पाण्याचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही महिने शेतीसाठी व शहरी भागातील नागरिकांसाठी चांगलेच अडचणीचे जाणार आहेत.

मागील वर्षी धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे सर्वच धरणे शंभर टक्के भरली होती. धरणे भरल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे उजनी धरण शंभर टक्क्यांहून अधिक भरले होते. यंदा परतीच्या पावसाने दगा दिला. मात्र, जून-जुलैपासून सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत धरण परिसरात पावसाच्या मध्यम व जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर वगळता सर्वच धरणे शंभर टक्के भरली. मात्र, परतीचा पाऊस होईल, असे गृहित धरून पुन्हा खडकवासल्यातून विसर्ग सोडला. परिणामी यावर्षीही उजनी धरण शंभर टक्के भरले. परंतु, यंदा पुण्यासमोर मोठा पाणीप्रश्न उभा राहिला आहे.1जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, आंद्रा, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर, वीर या धरणात ६ जानेवारी २०१८ रोजी ९५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.तर याच धरणांमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी ७७.१८ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या 2वर्षाच्या तुलनेत यंदा या धरणांमध्ये १८ टीएमसीहून अधिक पाणीसाठा कमी आहे. तर पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला धरण प्रकल्पात १७.४३ टीएमसीएवढाच पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षापेक्षा हा साठा ४.१३ टीएमसीने कमी आहे. गेल्या वर्षी ६ जानेवारी २०१८ रोजी प्रकल्पात २१.५६ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.जिल्ह्यातील धरणातील ६ जानेवारीच्या पाणीसाठ्याची टक्केवारी (कंसात टीएमसीमध्ये)धरणाचे नाव २०१८ २०१९कळमोडी ९९.११ (१.४९) ५१.४४ (०.७८)चासकमान ८०.४३ (६.०९) ४४.८७ (३.४०)भामा-आसखेड ६.७४ (६.७४) ७०.३१ (५.३९)आंद्रा ९६.५१ (२.८२) ८५.४९ (२.५०)पवना ७७.०२ (६.५५) ६५.७२ (५.५९)मुळशी ६७.८१ (१२.५२) ६५.४६ (१२.०८)टेमघर ०.२३ (०.०१) ३.३५ (०.१२)वरसगाव ८३.१७ (१०.६६) ६९.२५ (८.८८)पानशेत ९०.२७ (९.६१) ६७.७६ (७.२२)खडकवासला ६४.७५ (१.२८) ६१.५१ (१.२१)गुंजवणी ५०.४६ (१.८६) ५१.७१ (१.९१)नीरा देवघर ८३.३३ (९.७७) ५७.६६ (६.७६)भाटघर ८८.२८ (२०.७५) ६१.५६ (१४.४७)वीर ६०.६८ (५.७१) ७४.२६ (६.९९)नाझरे ५३.६४ (०.३२) ०.०० (०.००)उजनीत केवळ ४१ टक्के पाणीजिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे उजनी धरण दोन्ही वर्षी १०० टक्के भरले होते. मात्र, मागील वर्षी ६ जानेवारी २०१८ रोजी उजनीत १०४.३५ टक्के म्हणजेच ५५.९० टीएमसीएवढा पाणीसाठा होता. मात्र, यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी उजनीत ४१.३३ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २२.१४ टीएमसी आहे.

टॅग्स :Puneपुणे