दौंड : दौंड तालुक्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, ठिकठिकाणी वाहतूक करणाऱ्या ३५ ट्रकवर कारवाई करण्यात आली. एका दिवसात ७ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात या गाड्यांची लाईनच लागली आहे. दौंड, यवत, पाटस, देऊळगावराजे, पुणे-सोलापूर महामार्ग या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार उत्तम बडे, डॉ. सुनील शेळके, मंडलाधिकारी, तलाठी यांनी कारवाई केली. (वार्ताहर)
दौंडला वाळूच्या ३५ ट्रकवर कारवाई
By admin | Published: February 10, 2015 11:53 PM