शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

ओतूरमध्ये राखणदारावर बिबट्याचा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:57 PM

ओतूर तालुक्यातील घुलेपट-उंब्रज पांद येथे बाजरीच्या पिकांची रात्री राखण करणाऱ्या व्यक्तिवर बिबट्याने झोपेत असताना अचानक हल्ला केला.

ओतूर : ओतूर तालुक्यातील घुलेपट-उंब्रज पांद येथे बाजरीच्या पिकांची रात्री राखण करणाऱ्या व्यक्तिवर बिबट्याने झोपेत असताना अचानक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव हनुमंत महादेव जाधव (रा.अहिनवेवाडी, ओतूर, ता.जुन्नर) असे आहे, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.रघतवान यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव महादेव नलावडे यांच्या बाजरीच्या पिकाचे राखण करण्यासाठी जाधव यांना ठेवले होते. मात्र, सोमवारी (दि.१४ मे) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते पिकाशेजारीच झोपला असता बिबट्याने हल्ला चढवत त्यांच्या तोंडावर पंजे मारून जखमी केले. अशा अवस्थेत ते जीवाच्या आकांताने ओरडले.तेथे जवळपास वनमजूर फुलचंद किसन खंडागळे होते. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते जाधव यांच्याजवळ आले. जखमीची अवस्था बघून त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मोबाईल वरून कळविले. संदेश मिळाल्याने वनविभागाचे कर्मचारी एस.बी. महाले ,व्ही.आर अडागळे, एस.जी. मोमीन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी जाधव यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 

टॅग्स :junnarजुन्नरleopardबिबट्या