शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: May 05, 2017 2:46 AM

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे मनुष्याचीही उन्हाच्या चटक्यांनी लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात सिमेंटच्या

रावेत : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे मनुष्याचीही उन्हाच्या चटक्यांनी लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात सिमेंटच्या जंगलात वावरत असताना प्रतिकार शक्ती कमी असलेल्या पक्ष्यांचे हाल होत आहेत. यामुळे परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याकरिता नागरिकांनी झाडे व घरांच्या छतांवर पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन विविध क्षेत्रांतून होत आहे. दरम्यान पक्ष्यांसाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करीत आहेत. सिमेंटच्या इमारतींमध्ये झाडे हरवली, वाढती लोकसंख्या आणि आधुनिकीकरणाच्या जगतात शहरातील झाडांची संख्या घटली आहे. यातच शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली असल्याने झाडे बोटावर मोजण्या इतकीच उरली आहेत. सिमेंटच्या भिंतींनी शहराला वेढा घातला आहे. झाडांची संख्या घटल्याने आसऱ्याकरिता पक्ष्यांना वणवण फिरावे लागत आहे.(वार्ताहर)पक्षी मे महिन्यात घरटे बांधण्यास सुरुवात करतात आणि एक महिन्यानंतर त्या घरट्यात ठेवलेल्या अंड्यातून पिलं बाहेर येतात. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असतो. जेणेकरून गवत, पालापाचोळा व पाणी उपलब्ध होते. कीटक, अळ्या, फुले, फळे हे पक्ष्यांचे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होते आणि पिल्लांची वाढ जोमात होते. म्हणून उन्हाळ्यात पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे आपल्याकडून काही मदतीची त्यांना गरज असते. ती गरज फूल व फळे देणारी झाडे लावल्याने पूर्ण होऊ शकते. - सुहास भालेकर, पक्षिमित्र पक्ष्यांचा कळवळा मेसेजपुरताचपक्ष्यांना वाचवा, असा संदेश देणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर पाणी ठेवा, खाद्य ठेवा असे मेसेज न चुकता एकमेकांना पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात कृती फार कमी जण करताना दिसून येतात. मेसेज फॉरवर्ड करण्यापुरतेच पक्ष्यांचा कळवळा पाहण्यास मिळत आहे.भूतदया : पक्ष्यांसाठी पाण्याची सोयउन्हाच्या कडक वातावरणात पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षिमित्रांसह काही निवडक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर, खिडक्यांवर, झाडांवर, गॅलरीत पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी छोट्या कुंड्या ठेवल्या आहेत. पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता सोयीस्कर व्हावे तसेच परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हावी यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.