शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

गावे गडप होण्याचा धोका

By admin | Published: November 24, 2014 12:30 AM

मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे

विलास भेगडे, तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली अनेक गावे व वसाहती गडप करू शकतात. या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. मावळ तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव असल्याने मागील काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले असल्याने पुणे - मुंबईच्या धनिकांचा मावळकडे ओढा आहे. सध्या मावळ तालुक्यात एजंट/दलालांचा सुळसुळाट आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक होणारच नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. यामुळे अशा गावांचे सर्वेक्षण करून शासन पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. १९८९ मध्ये म्हणजेच २५ वर्षांपूर्वी मावळातील भाजे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३७ माणसांना जीव गमवावा लागला होता, तर देवघर येथे अशाच घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले होते. नायगाव येथील डोंगरावरील दरड बुधवारी (दि. १९) कोसळून बांधकामावर काम करणाऱ्या विघ्नेश मेश्राम (वय २९) या कामगारास आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे डोंगर पोखरण्याचे प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मावळात दर वर्षी धो-धो पाऊस कोसळतो. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळा-खंडाळा या भागासह पवन मावळ, आंदर मावळ, नाणेमावळातील डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात. बंगलेवाल्यांनी डोंगरावर बनविले रस्तेपाले व करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहेत. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, येथे तसेच तिकोणा, लोहगड या किल्ल्यांखाली मोठमोठी हॉटेल, रिसॉर्ट व खासगी फार्महाऊस उभारले आहेत. त्यामुळे या भागात अधूनमधून मातीचे ढिगारे कोसळतात. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडे व सुळके या गावांना धोकादायक आहेत. या गावात बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावरच घरे उभारली आहेत.डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावर राहणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. ग्रामीण भागातील मावळची लाल माती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. तिचाही बेसुमार उपसा सुरू असल्याचे दिसून येते. डोंगरकडेची माती उपसल्याने पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच जमीनदोस्त होण्यासारखी परिस्थिती मावळात अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मावळ तालुक्यातील बेकायदा खोदकाम व अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याची करडी नजर आहे. दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येते. कायद्याचे पालन करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता खनिज संपत्तीचे जतन केले जाईल. यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील अनधिकृत बांधकाम व खोदकामास जलद आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागृत राहून महसूल खात्याला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी लोकमतशी बोलताना केले.