शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

जेजुरीत १६५ ठिकाणी डेंगीच्या अळ्या; बारामती, पुरंदरमध्ये आरोग्य विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:56 AM

जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असता एक महिन्याच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये सुमारे १६५ ठिकाणी साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

जेजुरी : जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असता एक महिन्याच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये सुमारे १६५ ठिकाणी साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. १२५ ठिकाणची निवासस्थाने दूषित आढळून आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.तपासणी केल्यानंतर संबंधित घरमालकांना आरोग्य विभागाच्या वतीने नोटीस देण्यात येऊन आवश्यक त्या सूचना व उपाययोजना करण्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नागरिक सूचना देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचे आरोग्यसेवक सुभाष गायकवाड व संतोष भोसले यांनी सांगितले.शहराला पाणीपुरवठा करणारे नाझरे जलाशय पूर्णत: कोरडा पडल्याने सध्या मांडकी डोहावरून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्याअनुषंगाने नागरिक आपल्या घरामध्ये दैनंदिन वापरासाठी पाण्याची साठवण करतात. एक महिन्याच्या कालावधीत सुमारे शहराच्या विविध भागांतील सुमारे १९३९ घरे तपासण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने मुख्य गावठाण, जुनी जेजुरी, लवथळेश्वर, खोमणे आळी, गडकोट पायथा, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणांमधील नागरिकांच्या साठवलेल्या पाण्यात डेंगी डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्यात जंतुनाशक औषध टाकून तत्काळ पाण्याची भांडी रिकामी करण्यात आली आहेत. काही नागरिकांना त्याबाबत आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत.लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : डेंगीच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांचे ठिकाण नष्ट करण्याची मोहीम बारामती नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील जुन्या हॉटेल कृषिराजच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून साठलेल्या पाण्यात डासांचे आगर झाले आहे. त्याची तपासणी तालुका आरोग्याधिकारी, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांनी केली. नगरपालिकेचे आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक पाहणीसाठी गेलेले असताना हॉटेलमालकाने एकेरी भाषेत त्यांना धमकावल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या आजी-माजी नगरसेवकांसमोर हॉटेलमालकाची मुजोरी अधिकाºयांना ऐकावी लागली.बारामती शहरात डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तो रोखण्यासाठी पाणी साठवण असलेले ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बारामती शहरातील हॉटेल कृषिराज जुने हॉटेल आहे. त्या ठिकाणी लॉजिंगची सुविधादेखील आहे. या हॉटेलच्या तळमजल्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साठले आहे. जवळपास दीड ते दोन हजार चौरस फुटाच्या परिसरात कमालीची दुर्गंधी आहे. दारूच्या मोकळ्या झालेल्या बाटल्यादेखील त्याच ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत. साठलेल्या पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी हॉटेलशेजारीचराहत असलेले माजी नगरसेवक शाम इंगळे यांनी अनेकदा केली. हॉटेलमालकांशीदेखील याबाबत त्यांनी अनेकदा चर्चा केली. परंतु, तळमजल्यातील पाणी उपसा करण्याची तसदी घेतली नाही.आज पंचायत समितीचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश जगताप यांच्यासह कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणारे हिवताप नियंत्रण कर्मचाºयांनीदेखील त्याची पाहणी केली. तळमजल्याला मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यात डास व डेंगीला आमंत्रण देणाºया डासांच्या आळ्यांचे साम्राज्यच असल्याचे दिसून आले. दुपारी नगरपालिकेचे आरोग्याधिकारी रवींद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले असताना हॉटेलमालक विक्रांत जाचक यांनी पाणी उपसा केला जाईल, असे न सांगता थेट अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली. एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना नगरसेवक गणेश सोनवणे यांनी त्या हॉटेलमालकालासांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनादेखील न जुमानता अरेरावी चालूच ठेवली. अखेर माजी नगरसेवक शाम इंगळे यांनी समजावून सांगितले. त्याच दरम्यान, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीलिमा मलगुंडे या तिथे आल्या. या प्रकाराची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनादेखील दिली.हॉटेलमालकाची मुजोरीतालुका आरोग्याधिकाºयांनी केलेल्या पाहणीत गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या पाण्याचा उपसा झालेला नाही, असे निदर्शनास आले. जवळपास दीड ते दोन फूट पाणी तळमजल्यात आहे. संपूर्ण बारामती शहराचे आरोग्य धोक्यात येईल, अशीच स्थिती असताना हॉटेलमालकाने नमती भूमिका न घेता अंगावर धावून जाऊन नगरपालिकेच्या कर्मचाºयांना वापरलेल्या अरेरावीच्या भाषेमुळे अधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्या अरेरावीला न जुमानता नगरपालिका अधिकाºयांनी हॉटेलच्याच कर्मचाºयांची मदत घेऊन जवळपास १० लिटर आॅईल या पाण्यात टाकले. मात्र, हॉटेलमालकाने कोणतीही दखल न घेता तेथून निघून गेला. डासांच्या अळ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पाणी उपसा करणेच गरजेचे आहे. त्यानंतर आलेल्या त्याच्या भावाने मात्र सामंजस्याची भूमिका घेऊन नगरपालिकेच्या अधिकाºयांना पाण्याचा उपसा केला जाईल, असे सांगितले. शेजारीच राहत असलेले माजी नगरसेवक शाम इंगळे यांच्या मुलाला मागील वर्षी डेंगीच्या आजाराने ग्रासले होते. तेव्हापासून त्यांनी त्या पाण्याचा उपसा करावा, असे सातत्याने सांगितले.शेजारच्या इमारतींच्या तळमजल्यात डास...त्याचशेजारी असलेल्या काळे प्राईड या व्यापारी इमारतीमध्ये पार्किंगसाठी असलेल्या तळमजल्यावर पावसाचे पाणी साठले आहे. अगदी या इमारतीच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत साठलेल्या पाण्यातदेखील डासांच्या अळ्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. या इमारतीमध्ये असलेल्या पंक्चरच्या दुकानात पंक्चर काढण्यासाठी साठवलेल्या पाण्याच्या टँकमध्येदेखील डासांच्या अळ्या आढळून आल्या....तर फौजदारीकारवाई होणारदरम्यान, हॉटेलमालकाने केलेल्या अरेरावीची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आली. तसेच मुख्याधिकाºयांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तरीदेखील पाण्याचा उपसा न केल्यास फौजदारी कारवाई करण्याची तयारी नगरपालिका प्रशासनाने ठेवली आहे. याशिवाय हॉटेलचा परवानादेखील रद्द करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत.साठवलेल्या स्वच्छ पाण्यातूनच डेंगीच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात.घरानजीक टायर, नारळाच्या करवंट्या, पत्र्याचे डबे, बाटल्या, प्लॅस्टिकची भांडी किंवा पावसाचे पाणी साचून राहील, असे साहित्य ठेवू नये ते नष्ट करावे. पाणी साठवणारी भांडी उदा. रांजण, माठ, हौद, मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आदी किमान आठवड्यातून एक दिवस मोकळे करून कोरडे ठेवावेत.पाणी भरल्यानंतर झाकणे लावून बंद करावीत. मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे मोफत नगरपालिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत ते नेऊन सोडावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.