शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 8:25 PM

पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो.

ठळक मुद्देऔषध फवारणीची मागणी : पावसाळी साथीच्या रोगांची भीती पावसाळी वातावरणामुळे डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीती

हडपसर : रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी दलदल झाली आहे. या पावसाळी वातावरणात सार्वजनिक ठिकाणी तुडुंब भरुन वाहणाऱ्या कचरा कुंड्या ...त्यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, वाढलेले डास, कीटक यांचे प्रमाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचराकुंड्या वेळच्यावेळी उचलून त्याठिकाणी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कचरा आणि दलदल यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हडपसर, मगरपट्टा, भीमनगर, वैदूवाडी, साडेसतरानळी परिसरातून दोन कालवे वाहत आहेत. सध्या पाण्याचा प्रवाह बंद असल्यामुळे दोन्ही कालव्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणगवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही ठिकाणी मलवाहिनीही कालव्यात सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकाट कुत्री आणि डुकरांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि कालवा कचऱ्याचे आगर बनले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डास-मच्छरांची उगमस्थानेच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. त्या ठिकाणी मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरे अन्न शोधण्यासाठी कचरा विस्कटतात. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून हा कचरा नागरी वस्तीमध्ये जात असल्याने नागरिक त्रासले आहेत.                                              ......................डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीतीपावसाळी वातावरणमुळे स्वाइन फ्लूच्या एच-१ आणि एन-१ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी जास्त दिवस साठवून ठेवल्यामुळे डेंग्यूचे विषाणू तयार होतात. पावसाळ्यामध्ये गाळमिश्रित पाणी येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पिण्याची गरज आहे                             ................अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या ओव्हरफ्लोपालिका प्रशानाने कचराकुंड्यामुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, उपनगर आणि परिसरात रस्त्यावरील कचराकुंड्या आजही ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. वानवडी आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वादामध्ये नागरिक भरडला जात आहे.                            ......................पावसाळी वातारणात बाहेर पडताना नाक, तोंड बांधून बाहेर पडावे.पाणी उकळून आणि गाळून पिण्यासाठी वापरावे. उघड्यावरील पदार्थ खावू नयेत. मच्छरदाणी वापरावी, आजाबाजूला पाण्याची डबकी साठू देवू नयेत. पाण्याचा निचरा करण्याविषयी प्रशासनाला माहिती द्यावी. मधुमेहाच्या रुग्णांनी जखम झाली, तर त्वरित उपचार करावेत. जखम बरी होईपर्यंत बाहेर गेल्यानंतर जखम ओली होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुतखड्यासारखे आजार होण्याची शक्यता असते. कमीत कमी पाच लिटर पाणी पिण्याची गरज आहे.-डॉ. आशिषकुमार दोषी

टॅग्स :HadapsarहडपसरHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका