भिगवण धान्य बाजारातील आडतदार यांच्या ताब्यातील ही इमारत होती. दगड, माती आणि सिमेंटमध्ये अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही उंच इमारतीची पूर्व बाजू काही वर्षापूर्वी ढासळली होती. त्यामुळे संपूर्ण इमारत पडून शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकमतने अनेक वेळा ही धोकादायक इमारत हटविण्याची मागणी केली होती. मात्र आडतदार आणि बाजार समितीच्या वेळकाढू आणि अनेक वेळा नोटीस दिल्याचे सांगत इमारत हटविण्यात येत नव्हती. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे इमारत अजूनही जास्त धोकेदायक झाली होती. तर पावसाच्या वेळी आणि बाजार दिवशी अनेक कष्टकरी कामगार आणि शेतकरी या इमारतीच्या आडोशाला येत होती. त्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या जिवावरील संकट दूर झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
इंदापूर बाजार समितीवर सत्ताबदल झाला असता अनेक सुविधा निर्माण होतील असे बोलले जात होते. मात्र, अनेक वर्षे उलटली असली तरी डिपाॅझिट आणि भाडे वाढीशिवाय कोणत्याही सुविधा वाढल्या नाहीत. तर पावसाळ्याच्या दिवसात चिखलातून मार्ग काढल्याशिवाय दुकानात प्रवेश करणे शक्य होत नसल्याचे वास्तव या ठिकाणी पहावयास मिळते.