भानुदास पऱ्हाड/ लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : पावसामुळे इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा स्थितीतही या ठिकाणी येणारे भाविक, तसेच विद्यार्थी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरत आहेत. घाटावर सुरक्षारक्षक नसल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. आळंदी देवाची येथे चार दिवसांपूर्वी एका तेरावर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळी हंगामात या प्रकारच्या अपघातांची संख्या वाढत आहे. येथील स्थानिक विद्यार्थी नदी किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज न घेता सेल्फी काढतात. पुलावर बसून नदीपात्रात पाय सोडून विद्यार्थी बसत असत आहेत. या गोष्टी त्यांच्या जिवावर बेतत आहेत. इंद्रायणी नदीच्या काठी रोज हजारो भाविक तसेच पर्यटक येत असतात. अंघोळ करण्यासाठी भाविक नदीत उतरत असतात. नगरपरिषदेने सुरक्षात्मक उपायोजना करणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष झाले आहे. भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजनांची मागणी होत आहे. नदीपात्रात पाणी वाढलेनगरपालिकेने नागकिरांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून घाटावर किमान दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने इंद्रायणी नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असून, पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. मात्र घाटावर बेजबाबदारपणे अनेक जण आपला जीव धोक्यात घालत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता आहे.
इंद्रायणीकाठ बनला धोकादायक
By admin | Published: July 08, 2017 1:57 AM