बारामती : गुणवडी (ता. बारामती) गावाच्या हद्दीत धोकादायक पद्धतीने वैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा टाकण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता ग्रामीण भागाच्या हद्दीत अशा पद्धतीने कचरा टाकून येथील रहिवासी व जनावरांच्या आरोग्याशी खासगी रुग्णालये खेळत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.गुणवडी गावाच्या हद्दीतील नीरा डाव्या कालवाच्या नजीकच्या रस्त्यावर एका गोणीमध्ये हा वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. शेजारून कालवा गेलेला असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली असतात. तसेच हा भाग निर्मनुष्य असल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी चारचाकी गाडीमधून बारामती शहरातील खासगी रुग्णालयामधून हा कचरा येथे टाकण्यात आला आहे. गुणवडी गावामध्ये एवढ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारे एकही रुग्णालय नाही. तसेच बारामती शहराला चिकटूनच गुणवडी गावाची हद्द असल्याने शहरातीलच एखाद्या रुग्णालयाने या ठिकाणी कचरा टाकला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.हा प्रकार वारंवार होत आहे. तसेच गावातील जनावरे या ठिकाणी चरण्यास येत असतात. या कचºयामध्ये सुया, इंजेक्शन आदींचाही समावेश आहे. या ठिकाणी शेतजमिनी, विहिरी आहेत. पाण्यामध्ये या वैद्यकीय कचºयाद्वारे संसर्ग पसरण्याचाही धोका आहे. त्यामुळे बारामती नगरपालिकेचा आरोग्य विभाग, तसेच तालुका आरोग्य विभागाने अशा पद्धतीने विल्हेवाट न लावता वैद्यकीय कचरा धोकादायकपणे टाकणाºया रुग्णालयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनीकेली आहे.
धोकादायक वैद्यकीय कचरा रस्त्यावर, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:31 AM