चासकमान : आधुनिक काळात शैक्षणिक सामाजिक गरजा बदलत चाल्या आहे. तसेच शिक्षण घेण्याची पद्धत बदलली. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड काही थांबता थांबली दिसत नाही. ही परवड विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या निमित्ताने समोर दिसत आहे. विद्यार्थीचा घर, शाळा ते परीक्षा केंद्रापर्यत पहावयास मिळत आहे. हेच विद्यार्थी असुरक्षीत पणे खासगी वाहनांना हात करुन लोंबकळत आपला जिव मुठीत धरुन परीक्षेला तसेच शाळेत विद्यालयात जाताना दिसत आहे. सुरक्षित तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी ला परीक्षा देता यावी याचे उत्तर दायित्व कोणाचे? हा प्रश्न सद्या मात्र उनुउत्तरीत असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रे व महाविद्यालये १०ते १२ किमी च्या अंतरावर असल्याने परीक्षेसाठी तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी जिप, टेम्पो, ट्रक, शेतमालवाहु वाहनांमधन टूव्हीलर वर चार-चार बसून हे विद्यार्थी धोकादायकरित्या सरास प्रवास करताना दिसत आहे. प्रवासात विद्यार्थीची दगदग, रात्रीच्या वेळी अभ्यासाठी जागरण, मानसिक थकवा याला ग्रामीण भागातील विद्यार्थी ना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.(वार्ताहर)
विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
By admin | Published: March 21, 2017 5:27 AM