जेजुरी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक कै. जवाहरलाल दर्डा यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतरही दर्डा कुटुंबीय देशसेवेत अग्रभागी आहे. तोच देशसेवेचा वारसा आजही सुरू आहे. ज्या ज्या वेळी देशासमोर प्रश्न उभे राहिले, त्यावेळी हा परिवार अग्रभागी असतो. त्याचेच उदाहरण आजच्या 'रक्ताचं नातं' या रक्तदान अभियानात समोर येत आहे असे मत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
जेजुरी येथे दै. लोकमतच्या ‘रक्ताचं नातं’ हे रक्तदान महाअभियान गुरुवारी पार पडले. या वेळी जगताप बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेजुरीच्या नगराध्यक्ष वीणा सोनवणे, माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, भय्यासाहेब खाटपे, अल्का शिंदे, सचिन पेशवे, नगरसेवक अजिंक्य जगताप, सुरेश सातभाई, रुक्मिनी जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, मेहबूब पानसरे, अमोल खवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत उद्योग समूह व जेजुरी नगरपरिषद यांच्या वतीन जेजुरी येथील कडेपठार रिसॉर्ट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ससून सर्वोपचार प्रादेशिक रक्तपेढीने या रक्तदानासाठी सहकार्य केले. डॉ. उत्कर्ष गोसावी, रक्तसंक्रमण अधिकारी अरुण बर्डे, समाजसेवा अधीक्षक व टीमने रक्तसंकलन केले. यावेळी रक्तदात्यांनी उतस्फूर्त सहभाग घेतला होता
११ जेजुरी.
रक्तदानात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणापत्र देताना मान्यवर.