शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Darshana Pawar Murder: दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक; कारणही आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:00 IST

गेल्या काही दिवसांपासून राहूल हंडोरे फरार होता...

पुणे : एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता दर्शनाचा मित्र राहूल हंडोरेला अटक करण्यात आले आहे. तसेच दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने राहुलने हत्या केल्याचा संशय केलं व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल फरार होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिचा मित्र राहुल हंडोरेला आता अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

दर्शनाच्या हत्येचे कारण-

दर्शना आणि राहूल एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन आधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केल्याचा संशय आहे.

एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीमध्ये दर्शनाचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी दर्शनाने उत्तम भाषणही केले होते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते अशी प्रतिक्रिया तिने भाषणांत दिली होती. 

"प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी..."

भाषणात दर्शना म्हणाली होती की, प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी आहे. ती ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे यशस्वी स्टोरी म्हणून येते. आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलतायेत, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. अभ्यास कसा केला पाहिजे हे विचारतात. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते असे म्हणत दर्शनाने भाषण संपवले. 

टॅग्स :rajgarh-pcराजगढCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसDarshana Pawarदर्शना पवार हत्या