शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या 'दस्त नोंदणी कार्यालया'कडे शासनाचे दुर्लक्षच...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 3:48 PM

शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे...

धनकवडी:धनकवडीसह, दत्तनगरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सुविधांची वाणवा असून कधी सर्व्हर डाउनची डोकेदुखी तर कधी खंडित वीजपुरवठ्याचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दत्तनगरमधील सब रजिस्ट्रार रजेवर तर धनकवडीतील दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने मागील पंधरा दिवसा पासून ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २० दत्त नगर येथील सबरजिस्ट्रार गेल्या आठ दिवसांपासून रजेवर आहेत. तर हवेली नं ९ धनकवडी या कार्यालयाचे कामकाज नोंदणी झालेले दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने मागील पंधरा दिवसापासून ठप्प झाले आहे.

दक्षिण विभागातील या दोन्ही कार्यालयात एका दिवसात १०० ते १२० दस्त नोंदणी होत असतात. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून एका कार्यालयात दस्त स्कॅन होत नसल्या कारणाने तर दुस ऱ्या कार्यालयात सबरजिस्ट्रार रजेवर असल्याने जवळपास ९०० ते १००० दस्त नोंदणी होऊ न शकल्याने शासनाचा लाखों रुपयांचा निधी अडकला आहे.

या दोन्ही कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच दक्षिण उपनगरांमधील भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकर वाडी, कात्रज, दत्तनगर, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, नर्हे, कोळेवाडी, भारती विद्यापीठ, धनक वडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, चव्हाण नगर, पद्मावती भागातील नागरिक व वकील दस्तनोंदणीसाठी येतात. सहायक निबंधक रजिस्ट्रार रजेवर असल्याने दस्तनोंदणीचे काम गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच नागरिकांना देखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या असल्याने नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र उपनगरांमधील विविध उप निबंधक कार्यालयात दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDhankawadiधनकवडीcivic issueनागरी समस्या