विशेष म्हणजे शाळेने या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. टेस्टी बाईट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जाधव, अनिला थॉमस, रवी मोहन, शंकर चक्रवर्ती, तुषार मुळीक यांच्या प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत संगणक मिळाले आहेत. मान्यवरांच्या हस्ते या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके दौंड चे उपसभापती सयाजी ताकवणे, झुंबर गायकवाड, सरपंच गजानन कदम, उपसरपंच कल्पना जाधव , उत्तमराव ताकवले,संदीप शितोळे, डॉ. राजेंद्र कदम, संजय पवार, पोलीस पाटील अंबादास कदम, प्रफुल्ल शितोळे, अभय थोरात आदी उपस्थित होते. यावेळी ॲग्री वाला फार्मर्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना राहुल पवार व अक्षय मुळे यांनी मोफत आंबे वाटप केले.
३१केडगाव शाळा
गलांडवाडी येथे संगणकावर अध्यापन करताना विद्यार्थी.