सोमवारी सकाळी मंदिरात विद्या अंबर्डेकर यांसह २१ महिलांनी रुद्रपठण केले. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते लघुरुद्र पार पडला. यावेळी कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते.
दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ६ वाजून ०५ मिनीटांनी दत्तजन्म सोहळा पार पडेल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भव्य एलईडी ची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे भाविकांना सोशल डिन्स्टसिंग पाळून हा सोहळा पाहता येईल. फेसबुक पेजवरुन भाविकांना दत्तजन्म सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे.
मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष व वंदना मोहिते यांच्या हस्ते लघुरुद्र होणार आहे. विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांसह लीना लोंढे आणि समीर व अस्मिता भुजबळ यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी ८ व दुपारी २ वाजता दत्तयाग होईल. दुपारी १२.३० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते माध्यान्ह आरती होणार आहे. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.