सासवड : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील दत्त जयंती उत्सवास रविवार पासुन सुरूवात करण्यात आली. यज्ञ कुंडाचे पुजन व आजोळी ज्योतीचे स्वागत श्री. नारायण महाराज यांचे हस्ते करून या उल्सवास सुरूवात झाली.
मंगळवारी (दि २९) साजरा होणाऱ्या दत्तजयंती सोहळ्यास रविवारपासून प्रथेप्रमाणे हिवरे येथील मानाच्या आजोळी पालखीचे व ज्योतीचे स्वागत नारायणपूर दत्त मंदिर प्रमुख श्री नारायण महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या स्वागत समारंभानंतर दिप पुजनाचा कार्यक्रम मध्यप्रदेश येथील उद्योजक विसरेन जैन यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आण्णासाहेब घोलप, दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षिरसागर माजी सरपंच रामभाऊ बोरकर, व गावातील व दत्त मंदिरातील मोजकेच शिष्यगण उपस्थित होते. या दिपुजनाच्या कार्यक्रमानंतर २० वर्षांपूर्वी केलेल्या शिवदत्त यज्ञाच्या २० साव्या वाढवसानिमित सतत तेवत ठेवलेल्या यज्ञकुंडाचे होम हवन व पुजा नाराणमहाराज यांनी हवन करून उत्सवाचा आरंभ केला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता दत्त महाराजांचा जन्मसोहळा साजरा होणार आहे. तर मंगळवारी जयंतीच्या मुख्य सोहळा पार पडणार असल्याचे नारायणपूर मंदिर व्यवस्थापक भरतनाना क्षिरसागर यांनी सांगितले.
यावेळी करोना महामारीमुळे दरवर्षी प्रमाणे साजरा न करता अगदी साधेपणाने व शासनाच्या नियमांचे काटेकोरपने पालन केले जात असल्याचे येथील पोलिस व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असलेले सहाय्यक पोलीस अधिकारी राजेश माने यांनी सांगितले.
फोटो :पुरंदर मधील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला