बारामतीत 'रात्रीस खेळ चाले',निरा डावा कालव्यालगतचे दत्त मंदिर एका रात्रीत हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:19 PM2020-08-27T13:19:44+5:302020-08-27T13:20:58+5:30

विकास करताना मंदिर जमीनदोस्त केल्याने सोशल मीडियावर नागरिकांची नाराजी

The Datta temple was removed who near Nira Dawa canal In Baramati | बारामतीत 'रात्रीस खेळ चाले',निरा डावा कालव्यालगतचे दत्त मंदिर एका रात्रीत हटवले

बारामतीत 'रात्रीस खेळ चाले',निरा डावा कालव्यालगतचे दत्त मंदिर एका रात्रीत हटवले

googlenewsNext
ठळक मुद्देविकास करताना मंदिर जमीनदोस्त केल्याने सोशल मीडियावर नागरिकांची नाराजी

बारामती: बारामती शहरातील निरा डावा कालव्यालगत चे श्री दत्त मंदिर एका रात्रीत हटवण्यात आले आहे. नगर परिषद कमानी पाठोपाठ एका रात्रीत हटवलेले मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं आहे.
सध्या शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.त्यानंतर बारामतीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. मात्र, विकास करताना मंदिर जमीनदोस्त केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त होत नाराजीची वाट मोकळी केली.
गुरूवार हा श्री दत्त गुरूंचा वार आहे. दर गुरूवारी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. आज देखील अनेक भाविक दर्शनाला आले होते. मात्र ,रात्रीत हटवलेले मंदिर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
निरा डावा कालवा सुशोभीकरण काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी हे मंदिर हटविण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र, मंदिर कोणी हटविले याबाबत माहिती समजू शकली नाही.

Web Title: The Datta temple was removed who near Nira Dawa canal In Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.