इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाच्या काळात अनेकदा कार्यकर्त्यां सोबत मिरवणुक, लग्न वरात व सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स केल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु मंत्रीमहोदयांच्या सौभाग्यवती सारिका भरणे यांना डान्स करताना कुणीही कुठेही पाहिल्याची चर्चा ऐकण्यात आली नव्हती. ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधुन इंदापूरात कोव्हीड योद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित लतायुग कार्यक्रमात सारिक यांनी 'परदेशीया' या गाण्यावर ठेका धरत डान्स केल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मैत्रीण ग्रुप यांच्या संयक्त विद्यमाने खास महिलांसाठी इंदापूर नगरपरिषद शेजारील मराठी शाळेत महिला कोव्हीड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. व जागतिक महिला दिना निमित्त भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना त्यांच्या लोकप्रिय गीताद्वारे आदरांजलीपर लतायुग कार्यक्रम ही ठेवण्यात आला होता. यावेळी सारिका भरणे या प्रमख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. कोरोना काळात सामाजीक कार्यात ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना सारीका भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लता मंगेशकर आदरांजली कार्यक्रमादरम्यान लोगो को कहेने दो, कहेते ही रहेने दो, सच झुट हम सबको पता है। मै भी हूँ मस्तीमे, तुभी है मस्तीमे,आ इस खीशी मे नाचे गाये। किस को पता क्या किसने किया, सब कहेते है तुने मेरा दिल ले लिया। या गाण्यावर उपस्थित महिलावर्ग नाचत असताना सारिका यांनी अन्य महिलांसोबत ठेका धरला. आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला आघाडी शहराध्यक्षा उमा इंगोले, मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका अणुराधा गारटकर व हेमा बाब्रस आदी उपस्थित होते.