सचिवपदी दत्तात्रय ठुबे
पुणे : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सचिवपदी डॉ. दत्तात्रय तुकाराम ठुबे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. दत्तात्रय ठुबे हे उच्च विद्याविभूषीत आहेत. मुळचे कान्हूर पठार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील असलेल्या डॉ. ठुबे यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण, कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पुणे येथे झाले. या महाविद्यालयाचे ते सुवर्णपदक विजेते होत. तत्पुर्वी, स्थापत्य अभियांत्की पदविकाही त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यांनी आयआयटी रूडकी येथुन पीएच डी केली. याशिवाय, एलएलएम, एमबीए हे अभ्यासक्रमही पुर्ण केले आहेत.
राज्य अभियांत्रिकी सेवेत आल्यानयतर, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग उभारणीत त्यांचा सहभाग होता. याशिवाय, पंतप्रधान सडक योजनेचे संचालक आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.