शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास दिवेकर यांच्या वतीने कासुर्डी येथील अनाथ मुलांचे दीपगृह निवासी आश्रमशाळेत फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सागर पारखे व विभागप्रमुख संदीप डुबे यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, खामगाव या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण व युवासेनेचे नीलेश मेमाणे, समीर भोईटे यांच्या वतीने पडवी व देऊळगाव गाडा या ग्रामपंचायत कार्यालयास यांना वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास दिवेकर व शाखाप्रमुख दत्ताभाऊ दिवेकर यांच्या वतीने वरवंड ग्रामपंचायत कार्यालयास वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अजित आटोळे यांच्या वतीने रावणगाव या ठिकाणी वृक्षारोपण व २५ फूट भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. शिवसेनेच्या तालुका महिला संघटक छाया जगताप, उपतालुकाप्रमुख नवनाथ जगताप, विभाग प्रमुख अजित फुटाणे, अभिजित डाळिंबे व गणेश कदम यांचे वतीने देऊळगाव राजे येथील कोविड सेंटरला फळे वाटप करण्यात आले. शिवसेना डॉक्टर सेलचे डॉ. प्रमोद रंधवे यांच्या वतीने राजेगाव येथे अंगणवाडीसेविकांना रोगप्रतिकार शक्तीचे औषधांचे वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिवसेना दौंड शहरप्रमुख आनंद पळसे यांचे वतीने सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना दौंड शहर यांचे वतीने दौंड शहरात शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना सभासद नोंदणी अभियान हा उपक्रम राबवण्यात आला.