शनिवार (दि.१६) रोजी सविता पवार यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली. लस दिल्यानंतर त्यांना अडीच तासांनंतर त्रास जाणवायला लागल्याने त्यांना लसीची रिअॅक्शन झाल्याचे निदर्शनास आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी दौंड शहरातील खासगी रग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्यावर उपचार करुन रात्र दहाच्या सुमारास ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डाॕॅ. संग्राम डांगे यांनी सांगितले.
सविता पवार यांनी जीवाची पर्वा न करता गेली नऊ महिने कोरोना बाधितांवर उपचार केले. मात्र, त्यांच्यावर कोरोनाच्या लसीकरण झाल्यानंतर त्रास सुरू झाल्याने काही औषधी खर्च त्यांना वैयक्तिक करावा लागला. हा खर्च शासनाने करणे अपेक्षित होते.