जयपूर येथील अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक परिषदेच्या वतीने जैनाचार्य हस्तीमलजी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी निमित्त राष्ट्रीय स्तरावर जैन धर्मातील सामायिक, प्रतिक्रमण सूत्र आदी विधींच्या मौखिक परीक्षा घेण्यात आल्या. त्यापैकी ऑनलाइन प्रतिक्रमण सूत्र स्पर्धेत दौंड येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी जिगीशा प्रफुल्ल भंडारी हिने पहिला क्रमांक पटकावला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पंधरा हजार रूपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दौंड येथील श्री जैन स्थानकात जैन महासती उज्वलाकंवरजी, कीर्तीसुधाजी, उन्नतीश्रीजी तसेच दिनेशाश्रीजी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ श्राविका चंद्रकला कटारिया यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरित करण्यात आले. येथील परीक्षा केंद्रातून विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या स्वाती कुणाल मुनोत, ममता प्रशांत सरनोत, पल्लवी पियुष चंगेडिया, उषा दिलीप मुनोत, स्मिता संतोष भंडारी, सोनिया प्रमोद कटारिया यांचा देखील याप्रसंगी प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरव केला. डॅा. जयकंवर मोहनलाल भंडारी यांनी संयोजन केले तर नीला राजेंद्र सरनोत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
माजी राष्ट्रपतींच्या आशीर्वादाची प्रेरणा
गेल्या अडीच वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या निवासस्थानी दौंड रोटरी क्लबने आयोजित केलेल्या एका गौरव सोहळ्यात जिगीशा प्रतिभा पाटलांना म्हणाली की, राष्ट्रपती होण्यासाठी काय करावे लागते? यावर प्रतिभा पाटील म्हणाल्या की, जिद्द ठेवावी लागते आणि तू जिद्द ठेवली तर नक्की राष्ट्रपती होशील असे आशीर्वाद जिगीशाला दिले होते. दरम्यान त्यांनी दिलेला आशीर्वादाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने आशीर्वादाची पहिली पायरी म्हणून जिगीशा पाठांतर स्पर्धेत देशात पहिली ठरली आहे.
१९ दौंड भंडारी
दौंड येथील जिगीशा भंडारी हिचा गौरव करताना चंद्रकला कटारिया.